महावितरणची ग्राहकांकडून रजाकारी वसुली

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण)
कडून थकबाकीदार ग्राहकांकडून सुरु असलेल्या रजाकरी वसुली मोहिमेमुळे अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. ही रजाकारी वसुली मोहीम थांबवावी अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. पार्ट पेमेंट (आंशिक रक्कम) स्वीकारण्यास नकार देत थेट वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पार्ट पेमेंट नाकारल्याचा आरोप महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे काही प्रशहकांना जास्तीचे बिल आकारण्यात आले. आकारण्यात आलेल्या जास्तीचे बिलाचे हसे पडून देण्यासाठी ग्राहक महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याकडे चकरा मारत आहेत परंतु संबंधित अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसतात या ठिकाणी असलेले कर्मचारी ग्राहकांशी उद्धटपणाने वागतात. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, थकबाकी असलेल्या ग्राहकांनी काही रक्कम तत्काळ भरण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, पूर्ण थकबाकी एकरकमी भरण्याची महावितरण अट घालून अधिकाऱ्यानी पार्ट पेमेंट स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

परिणामी अनेक घरांचे व व्यावसायिक आस्थापनांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले. दैनंदिन जीवन विस्कळीत वीजपुरवठा खंडित झाल्याने घरगुती कामे, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच लहान उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मोठा त्रास सहन नागरिकांना करावा लागत आहे. काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिक व रुग्णांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे.

--  नागरिकांचा इशारा --
स्थानिक रहिवाशांनी महावितरण प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करून पार्ट पेमेंटची सुविधा द्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींनीही या प्रकरणात लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, महावितरणकडून थकबाकी वसुली मोहिम तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असून अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे. वाढत्या तक्रारीमुळे प्रशासनासमोर समन्वयाचे आव्हान उभे राहिले आहे.